Friday , March 6 2026
Breaking News

भारत विकास परिषदेच्यावतीने घरकुल वृद्धाश्रमात वनमहोत्सव

Spread the love

 

बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने घरकुल वृद्धाश्रम येथे वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. बेनकनहळ्ळी येथील आश्रमाच्या निसर्गरम्य परिसरात विविध फळांची रोपे लावण्यात आली. भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ. सुरज प्रकाश यांच्या जन्मदिनानिमित्त आश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करण्यात आली.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. घरकुलचे चिंतामणी ग्रामोपाध्ये यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रांत अध्यक्षा स्वाती घोडेकर यांनी भारत विकास परिषदेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्राचार्य व्ही. एन. जोशी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
घरकुलच्या व्यवस्थापिका संध्या पाटील यांनी आश्रमाच्या वाटचालीची सचित्र माहिती करून दिली. स्वरा व श्रीशा मोरे यांनी सुंदर गीते प्रस्तुत करून सर्वांना मोहविले. आश्रमाचे सेक्रेटरी नामजी देशपांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमास सुभाष मिराशी, विनायक घोडेकर, सुहास सांगलीकर, कुबेर गणेशवाडी, जयंत जोशी, एन. बी. देशपांडे, ॲड. सचिन जवळी, स्मिता भुजगुरव, शुभांगी मिराशी, ज्योत्स्ना गिलबिले, शालिनी नायक आदि उपस्थित होते. यावेळी घरकुल आश्रमातील सर्व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *