Monday , December 23 2024
Breaking News

जनकल्याण सामाजिक शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मन्नूर संचलित, जनकल्याण सामाजिक व शैक्षणिक फौंडेशन मन्नूर मार्फत मन्नूर गावातील मराठी प्राथमिक शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना वह्यांचे वाटप व ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले, सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष एल. के. कालकुंद्री सर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती फोटोचे पूजन सर्व महिला संचालक यांच्या हस्ते तसेच दिपप्रज्वलन फौंडेशनचे अध्यक्ष एल के कालकुंद्री व संस्थेचे चेअरमन लक्ष्मण मंडोळकर यांच्या हस्ते व संचालक व सल्लागार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक संस्थेचे व्यवस्थापक महेश काकतकर यांनी केले, या नंतर शाळेतील गरजू व गरीब मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेतील फळ्यांची जीर्ण अवस्था पाहून स्मार्ट ग्रीन बोर्डचे वितरण करण्यात आले व विशेष सल्लागार चंद्रकांत कुलकर्णी सर यांनी पहिलीच्या सर्व मुलांना अंकलिपी व पेन्सिल पट्टीचे वाटप केले. आतापर्यंत फौंडेशन मार्फत विविध कार्य केलेली आहेत यामध्ये मुलांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, कोरोना काळात आर्सेनिक अलबम या गोळ्यांचे वाटप, गावातील माजी सैनिकांचा सत्कार,?गावातील 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम असे विविध उपक्रम आम्ही राबविलेले आहेत, या पुढेही ही संस्था समाज कार्यात अग्रेसर राहील, या कार्यक्रमाला चेअरमन लक्ष्मण मंडोळकर, व्हा. चेअरमन संदीप कदम, संचालक जोतिबा शहापूरकर, विनायक कालकुंद्री, सागर डोणकरी, संतोष केंचनावर, भरमा आनंदाचे, कल्लाप्पा तोरे, बसवंत नाईक, ब्रिजेश देवरमनी, सुधा बाळेकुंद्री, कविता सांबरेकर, सल्लागार नारायण शहापुरकर, सिद्राय बाळेकुंद्री, परशराम कदम,जोतिबा चौगुले, शीतल चौगुले, लता कडोलकर, मल्लाप्पा कोतेकर, कल्लाप्पा अष्टेकर, जयवंत मंडोळकर तसेच पिग्मी कलेकटर यल्लप्पा पाटील, कर्मचारी, पूनम डोंगरे, प्रतीक्षा चौगुले, मेघा बांदेकर तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर

Spread the love  येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *