बेळगाव : येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या श्री सुवर्णलक्ष्मी को- ऑप. क्रेडिट सोसायरीच्या सभासदांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे दि. 2/7/2024 रोजी गणपत गल्ली येथील मुख्य कार्यालयात आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर हे होते. व्यासपिठावर संस्थापक मोहन कोरकर, डॉ. जी राम खान हे उपस्थित होते. स्वागत संचालिका मथुरा शिरोडकर यांनी केले. दीप प्रज्वलन व धन्वंतरीची पूजा करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी डॉ. जी राम खान व सहकार्याचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी सभासदाना साथीचे रोगापासून कशा प्रकारे आपण बचाव केला पाहिजे. तसेच डेंग्यू व चिकनगुनिया या साथीच्या रोगाचा प्रसार कसा टाळावा हे त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल शिरोडकर यांनी सभासदाना साथीच्या आजारात काळजी घ्यावी, असे सांगितले. मोहन कारेकर यांचेही समयोचित भाषण झाले. यावेळी संचालक विजय सांबरेकर, विनायक कारेकर, दिपक शिरोडकर, समर्थ कारेकर, राजू बांदिवडेकर, माणिक सावरकर, स्नेहा सांबरेकर, सुरेश, कर्मचारी उपस्थित होते.