बेळगाव : समाजाचे आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेने नेहमी समाजहितासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते श्रीरामसेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर तसेच त्यांचे बंधू चंद्रकांत कोंडुस्कर यांनी लक्ष्मीबाई जयवंत कोंडुस्कर प्रतिष्ठानच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दप्तर (स्कूल बॅग)चे वाटप करण्यात आले. दि. 1 जुलै रोजी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल येळ्ळूर येथे कार्यक्रम करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना चंद्रकांत कोंडुस्कर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक पाखरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. एस. एस. बाळेकुंद्री यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्ते चंद्रकांत कोंडुस्कर, दत्तात्रय जाधव, किरण हुद्दार, येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी अध्यक्ष सतीश पाटील, ग्रा. पं. सदस्या सौ. मनीषा मनोहर घाडी, ग्रा. पं. सदस्या सौ. सोनाली श्रीकांत येळूरकर, एसडीएमसी अध्यक्षा रूपा श्रीधर धामणेकर, ग्रा. पं. सदस्य सौ. शिवाजी नांदुरकर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, ग्राम पंचायत सदस्य परशुराम परीट तसेच शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका एस. आर. निलजकर, शिक्षक वर्ग यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.