Friday , March 6 2026
Breaking News

मराठा सेवा संघ बेळगांवतर्फे ७ रोजी ‘माईंड पॉवर’वर परिसंवाद

Spread the love

 

बेळगाव : मागील महिन्यात कोल्हापूर येथील प्रसिद्ध माईंड ट्रेनर आणि मोटिवेशन स्पीकर शिवश्री विनोद कुराडे यांचे बेळगाव शहर व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन बेळगाव व येळ्ळूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्याला मराठा समाजातील विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या मार्गदर्शनाने प्रभावित झालेल्या पालकांच्या आग्रहास्तव विनोद कुराडे यांचे विद्यार्थी व पालक यांना पुन्हा एकदा मार्गदर्शन मिळण्याची सुवर्णसंधी ‘मराठा सेवा संघ’ बेळगाव जिल्हा अध्यक्ष किरण धामणेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध करून दिली आहे.
यात मुले ऐकत नाहीत, चिरखोड स्वभाव, उलट बोलणे, सारखे टि.व्ही पाहणे, हुशार आहे पण आभ्यास करत नाहीत आदी समस्यांचे निवारण तसेच स्मरणशक्ती, एकाग्रता व आत्मविश्वास कसा वाढवावा, परिक्षेत भरघोस यश मिळविण्यासाठी ध्येयनिश्चिती कशी करावी, क्रिएटिव्ह व्हिजुयलायझेशन द्वारे हवे ते यश कसे मिळवायचे याची माहिती व मार्गदर्शन होणार आहे. मराठा सभागृह, गणेश कॉलनी- संभाजीनगर, वडगाव- बेळगाव येथे रविवार दिनांक ७ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत होणाऱ्या या मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ इयत्ता नववी पासून पुढील विद्यार्थी व पालकांनी घ्यावा. कार्यक्रम वेळेत सुरू होऊन निर्धारित वेळेत संपणार असल्याने सर्वांनी वेळेचे बंधन पाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *