Thursday , September 19 2024
Breaking News

युवा समितीच्यावतीने मच्छे व लक्ष्मीनगर मच्छे येथील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

Spread the love

 

बेळगाव : मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून युवा समितीच्या वतीने इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते त्यानुसार आज शनिवार दिनांक ६ जुलै २०२४ रोजी मच्छे येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष श्री. सुधीर हावळ होते.
प्रमुख अतिथी समितीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. कृष्णा अनगोळकर यांनी मराठी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्यासाठी मोठ्या जनजागृतीची गरज असून कुठलाही न्यूनगंड न बाळगता पालकांनी आपल्या मुलांना मातृभाषेमध्ये शिकवावे असे आवाहन केले. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मातृभाषेतून शिक्षण ही आज काळाची गरज असून सीमाभागातील मराठी भाषा वाचवायची असेल तर सर्वांनी मराठी भाषेत शिकले पाहिजे आणि मराठी शाळा सुद्धा वाचवल्या पाहिजेत असे सांगितले. युवा समितीचे पदाधिकारी श्री. सागर कणबरकर यांनी युवा समितीच्या विविध उपक्रमाची माहिती दिली आणि मातृभाषेतून शिकून आज सर्वजण मोठ्या पदावर पोहचले असून माजी विद्यार्थ्यांनी आणि गावकऱ्यांनी प्रयत्न करून आपल्या आपल्या भागातील शाळा टिकवल्या पाहिजेत असे सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. के. के. बेळगावकर, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, केदारी करडी, गजानन छपरे, साईनाथ शिरोडकर, मोहन वसुलकर, जतीन मंडोळकर आदी पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते. सहशिक्षक श्री. बी. व्ही. शेळके यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षिका सौ. रेश्मा मोदी यांनी मांडले.
लक्ष्मीनगर मच्छे येथे सुद्धा शैक्षणिक साहित्याचे वितरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शांताराम पाटील होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बसवराज रेमानी, शाळा सुधारणा समिती सदस्य सुनील चौगुले शिक्षकवृंद उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रतिक्षा कदम हिचा बिजगर्णी येथे उद्या सत्कार

Spread the love  बेळगाव : बिजगर्णी येथील ग्रामस्थ मंडळाचे सदस्य यशवंत जाधव यांची नात कु. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *