बेळगाव : मुसळधार पावसामुळे केएलई मार्गावरील भला मोठा वृक्ष उन्मळून पडून याठिकाणी पार्किंग करण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवारी सायंकाळी बेळगावमधील केएलई रुग्णालय मार्गावर असणारे भले मोठे झाड मुसळधार पावसामुळे कोसळले. या भागात पार्किंग करण्यात आलेल्या तीन चारचाकी वाहनांवरच हे झाड कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाड कोसळल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. यावेळी घटनास्थळी वन विभाग आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली.
Belgaum Varta Belgaum Varta