Friday , November 22 2024
Breaking News

जिल्हा अर्बन सहकारी बँकांची परिषद गोव्यात संपन्न

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्हा अर्बन सहकारी बँक असोसिएशनची दोन दिवसीय परिषद गोवा येथील हॉटेल हेरिटेज येथे 8 व 9 जुलै रोजी संपन्न झाली. असोसिएशनच्या सभासद असलेल्या जिल्ह्यातील अर्बन बँकांचे 80 सभासद या परिषदेस उपस्थित होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे मानद अध्यक्ष एम. डी. चीनमुरी हे होते तर व्यासपीठावर मानद अध्यक्ष बाळप्पा कग्गणगी, उपाध्यक्ष बाळासाहेब काकतकर, खजिनदार अमरनाथ महाजनशेट्टी, सदस्य बी. ए. भोजकर व इतर उपस्थित होते .
पहिल्या दिवशी सायंकाळी झालेल्या सत्रात सर्व उपस्थितानी आपला परिचय करून दिला. यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब काकतकर, बाळप्पा कग्गणगी व इतरानी भाग घेतला. कर्मचाऱ्यांसाठी काय करता येईल? बँकेचे कामकाज कसे सुधारता येईल? याबाबत चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे निवृत्त एजीएम श्री. महादेवस्वामी यांनी बँकिंग रेगुलेशन ॲक्ट या विषयावर सुमारे तासभर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या कायद्यांची माहिती देऊन अर्बन बँक साठी सेक्शन 56 हा फार महत्त्वाचा असून सभासदांचे हित जपणे फार महत्त्वाचे आहे अशी माहिती त्यांनी दिली. अर्बन बँकांनी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नयेत तसेच कर्ज देताना घ्यावयाच्या जबाबदाऱ्या, रिझर्व बँकेचे नियम, कर्मचाऱ्यांना द्यावयाचे कर्ज, ठेवीदारांचे नॉमिनी याबाबत मौलिक असे मार्गदर्शन त्यांनी केले. त्यानंतरच्या सत्रात बेळगावचे चार्टर्डअकाउंटंट श्री. राज बोळमल यांनी बँकांची ऑडिट करत असताना आलेले अनुभव आणि बँकांचा व्यवसाय सुधारण्यासाठी घ्यावयाच्या दक्षता याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन केले. बँकांनी आपल्याकडे जेवढे सोने ठेव आहे तेवढ्या संपूर्ण रकमेचा विमा करावा, सायबर गुन्हे कसे टाळावेत, कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या चुका कशा टाळाव्यात? त्यासाठी वरचेवर बँकेच्या एक शाखा व्यवस्थापकाने दुसऱ्या शाखेला दरमहा किमान एकदा तरी जाऊन तपासणी करावी व त्यानीं आपला अहवाल द्यावा. कर्ज वसुलीसाठी वेगळी रिकवरी टीम तयार करावी यासारख्या सूचना केल्या.
या परिषदेत बेळगावच्या पायोनियर अर्बन बँक, मराठा बँक, बसवेश्वर बँक, हुक्केरी बँक, गोकाक बँक, खानापूर बँक, अथणी बँक, बेल्लद बागेवाडी बँकच्या संचालकांनी सहभाग घेतला. त्यानंतर झालेल्या चर्चेत पायोनियर अर्बन बँकेचे अनंत लाड, बेल्लद बागेवाडी बँकेचे पवन कत्ती, बसवेश्वर बँकेच्या सरला हेरेकर, बैलहोंगल बँकेचे डॉक्टर मेटगुड आणि मराठा बँकेचे बाळासाहेब काकतकर यांनी आपले मतप्रदर्शन केले. याप्रसंगी पायोनियर बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर, मराठा बँकेचे जेष्ठ संचालक बाळाराम पाटील, बसवेश्वर बँकेचे चेअरमन रमेश कळसन्नावर, प्रकाश बाळेकुंद्री, खानापूर बँकेचे चेअरमन अमृत शेलार, दीपा कुडची यांच्यासह जिल्ह्यातील बँकांचे ज्येष्ठ संचालक उपस्थित होते.
बाळासाहेब काकतकर यांच्या आभार प्रदर्शनाने या परिषदेचे सूप वाजले. परिषद यशस्वी करण्यासाठी बाळप्पा कग्गणगी, बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर व सहकार्यानी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना

Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *