Friday , March 6 2026
Breaking News

प्रगती सोसायटीच्या चेअरमनपदी अजित पाटील यांची निवड

Spread the love

 

बेळगाव : सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या महात्मा फुले रोड येथील प्रगती मल्टीपर्पज सोसायटीच्या चेअरमनपदी अजित गणपतराव पाटील यांची व व्हाइस चेअरमनपदी परशुराम एन. रायबागी यांची निवड झाली आहे.
अजित पाटील हे गेल्या अनेक वर्षात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून सोसायटीच्या स्थापनेपासून सोसायटीचे संचालक आहेत. याऱबल प्रिंट आणि पॅक या ख्यातनाम उद्योग समूहाचे ते संस्थापक व बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत तर रायबागी हे सावजी समाजामध्ये सामाजिक कार्यात अग्रगण्य असून कलर आणि केमिकल्सचा व्यवसाय करतात. तेही सुरुवातीपासून संचालक असून संस्थेच्या वाटचालीत या दोघांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *