Friday , March 6 2026
Breaking News

डॉ. सोनाली सरनोबत यांची राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेल्या डॉ. सोनाली सरनोबत या सामाजिक बांधिलकी आणि समर्पणासाठी ओळखल्या जातात. डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात काम करत असताना एक कुशल संघटक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. सोनाली सरनोबत यांनी बेळगाव आणि खानापूरमध्ये पक्षाचे केलेले कार्य लक्षात घेत पक्षश्रेष्ठींनी डॉ. सरनोबत यांच्यावर ही नवीन जबाबदारी दिली आहे. याबाबत राज्य भाजप अध्यक्ष विजयेंद्र, कर्नाटक महिला मोर्चा भाजपाध्यक्षा सी. मंजुळा, बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष सुभाष पाटील त्याचबरोबर बेळगावातील सर्व ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *