बेळगाव : नानावाडी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील मुख्य रस्त्याशेजारील नाल्यात सुशिक्षित आणि अशिक्षित अनाडी, मूर्ख आणि बेजबाबदा लोकांनी कचरा बांधून टाकलेल्या प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या आणि इतर कचरा व प्रशासनाचा बेशिस्त निष्काळजीपणा यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याची दखल आमचे जागरूक कार्यकर्ते श्री. अशोक यल्लाप्पा कोरवी (वय 60) यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वतः नाल्यात उतरून स्वच्छ करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि सहकारी श्री. नारायण भोसले, श्री. मोहिंदर नंदेश्वर, श्री. सत्यवान निर्गुण, श्री. सतीश रेडेकर, श्री. सचिन नंदेश्वर, श्री. सुनिल पाटील आणि श्री. सागर मगदूम यांनी मोलाची साथ दिली. तरी अजूनही प्रशासनाने यात जातीने लक्ष घालून समस्येचे निवारण करावे. अन्यथा लहान मुले, पाळीव जनावरे आणि जनतेलाही याचा नाहक त्रास सहन करावा लागेल. सर्व नागरिकांनी सुद्धा जबाबदारी घेऊन कचरा हा कचऱ्याच्या गाडीतच टाकावा.