Tuesday , March 3 2026
Breaking News

कडोलीतील अमानुष घटनेने गावात तणावाचे वातावरण; चोख पोलिस बंदोबस्त

Spread the love

 

स्वीय सहायक मलगौडा पाटील यांनी केली पीडित कुटुंबियांची विचारपूस

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात एका मतिमंद मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने गावात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तात्काळ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

कडोली गावातील आझाद गल्ली येथील समीर अब्बास धामणेकर (30) याला पोलिसांच्या ताब्यात घेतले. या घटनेने संतप्त झालेल्या तरुणीच्या कुटुंबीयांनी त्याच गल्लीत राहणाऱ्या नराधम समीरच्या कुटुंबीयांना माहिती दिली.

दरम्यान जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशावरून मंत्र्यांचे स्वीय सहायक मलगौडा पाटील कडोली येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन पीडित कुटुंबीयांना धीर दिला व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे मंत्री महोदयांच्या वतीने पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *