Tuesday , September 17 2024
Breaking News

वाढदिवसाचे औचित्य साधून येळ्ळूर ग्रामपंचायतीला पुस्तके भेट

Spread the love

 

बेळगाव : येळ्ळूर येथील ग्रामपंचायतीत ग्रंथालयांची स्थापना करून एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुकही होत आहेच शिवाय अनेकांनी आजवर येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील आयोजित उपक्रमांविषयी प्रशंसा व्यक्त केली आहे..
तर येळ्ळूर येथील युनियन बँकचे मॅनेजर अभिजीत सायमोटे यांनी आपल्या वाढदिवसानिमीत्त तसेच येळ्ळूर युनियन बँकेत 2 वर्षापूर्वी मॅनेजर म्हणून काम बजावलेले कीर्तीराज कदम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येळ्ळूर ग्रामपंचायतीला 75 पुस्तके भेट स्वरूपात दिली.
यांनी या आधीच येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील उपक्रमांची पहाणी केली होती.. त्यामुळे या उपक्रमांना प्रेरित होऊन गावाप्रती असलेल्या प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून आपलाही या स्तुत्य उपक्रमामध्ये सहभाग असावा या हेतूने हही पुस्तकं त्यांनी ग्रामपंचायतीला दिली. या पुस्तकांमध्ये “स्वराज्याचा श्री गणेशा – शिवाजी महाराज”, “स्वराज्याची स्थापना”, “स्वराज्याचा कारभार”, “व्यावसायिक म्हैसपालन”, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनचरित्र” अशा अनेक पुस्तकांचा समावेश आहे..
सुरुवातीला ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य सतीश पाटील बोलतांना म्हणाले की, अभिजीत सायमोटे आणि किर्तीराज कदम यांनी ग्रामपंचायतीचे काम जवळून पाहिले आहे. त्यातून आपण येळ्ळूर गावात काम करत असून आपणही या गावासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही पुस्तके ग्रामपंचायतीला भेटीदाखल देऊन सगळ्यांसमोर वाढदिवस कसा साजरा करावा याचं एक अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे.
यावेळी बोलतांना अभिजीत सायमोटे म्हणाले की, त्यांना पहिल्यापासूनच पुस्तकांची आवड होती.. त्यामुळे समोर एक हाच उद्देश होता की वाचन संस्कृती वाढावी तसेच अपन काय आणि किती देतो यापेक्षा समाजाला त्याचा कसा उपयोग होतो हे जास्त महत्त्वाचं असतं असंही यावेळी ते म्हणाले.
त्याचबरोबर आज पालकांसमोर सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मोबाईल.. आणि मुलांच्या हातून मोबाईल सुटायचा असेल तर तत्यांच्या हातात पुस्तक यायला हवं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट यावेळी त्यांनी सांगितली.
यावेळी किर्तिराज कदम यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की, आपल्याकडे जो पैसा आहे त्याचा नेहमीच सदुपयोग केला पाहिजे. म्हणजे तो पैसा लोकांना पार्टी देण्याऐवजी असे नवनवीन उपक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे जेणेकरून समाजाला त्याचा फायदा होईल.
तरी गावातली नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने अभिजीत सायमोटे आणि कीर्तीराज कदम यांचे ग्रामपंचायत अभिवृद्धी अधिकारी यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत सेक्रेटरी व ग्रंथपालक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावातील नागरीक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *