बेळगाव : दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नाना शंकरशेठ यांची १५९ वी पुण्यतिथी बुधवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. संयुक्त महाराष्ट्र चौक, नाना शंकरशेठ मार्ग येथे गांभीर्याने करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर, माजी अध्यक्ष विनायक कारेकर, सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे संस्थापक मोहन कारेकर, चेअरमन विठ्ठल शिरोडकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, दैवज्ञ सांस्कृतिक भवनचे अध्यक्ष मारुती सांबरेकर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बेळगावचे उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वन करण्यात आले व नाना शंकरशेठ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वेर्णेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले व नाना शंकरशेठ यांच्या कार्याचा आढावा घेतला.
यावेळी प्रमुख पाहुणे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आपले विचार मांडले. ते म्हणाले, नाना शंकरशेठ यांचे कार्य हे फार महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य आम्ही सतत डोळ्यासमोर ठेवून देश व समाजसेवा केली पाहिजे. यावेळी नगरसेवक जयतीर्थ सवदत्ती यांनी आपले विचार मांडले.
यावेळी दैवज्ञ समाज बांधव, दैवज्ञ गणेश उत्सव मंडळ दैवज्ञ व्यावसायिक संघ शहापूर, दैवज्ञ भगिनी मंडळ, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन तसेच अनेक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दैवज्ञ ब्राम्हण समाज शिक्षण संस्था व श्री सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे संचालक दिपक शिरोडकर, समर्थ कारेकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, राजू बांदिवडेकर, मधुरा शिरोडकर, राजू बेकवाडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुरा शिरोडकर यांनी केले.