Sunday , September 20 2026
Breaking News

उज्वलनगर नाल्यात आढळला अनोळखी मृतदेह!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरालगतच्या उज्वलनगर येथील नाल्यात आज बुधवारी दुपारी साधारण तीनच्या सुमारास एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला.

उज्वलनगर येथील पावसाच्या पाण्याने प्रवाहित असलेल्या एका नाल्यात अनोळखी युवकाचा मृतदेह झाडाच्या फांदीला अडकून पडलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. तसेच पंचनामा करण्यासाठी उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठवला. पोलिसांकडून मयत युवकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अंदाजे वय 35 ते 40 वर्षे असावे. तथापि पोलीस तपासअंती संबंधित युवकाचा मृत्यू नेमका कशामुळे व कसा झाला? हे स्पष्ट होणार आहे. माळमारुती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *