बेळगाव : वडगावच्या मंगाई यात्रेनिमित्त आक्षेपार्ह व्हिडिओ करून प्रसारित केल्याप्रकरणी तरुणावर माळमारुती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अजय श्याम कागलकर (वय 27, रा. रामनगर, गँगवाडी) असे संशयिताचे नाव आहे. सद्या मंगाई यात्रा सुरू आहे. याला अनुसरून अजयने व्हिडीओ करून आपल्या स्टेट्सला ठेवला होता.
यामध्ये त्याने आपण हिंदूंनी फक्त हिंदू व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी, असा आशय होता. दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने त्याने हा स्टेट्स ठेवल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माळमारुती ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी ही कारवाई केली.
Belgaum Varta Belgaum Varta