बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात सततच्या पावसामुळे घर कोसळून एक महिला जखमी झाली असून मंत्री हेब्बाळकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
घराची भिंत कोसळून झालेल्या या घटनेत पार्वती होदेप्पा हुदली (३१) ही महिला जखमी झाली आहे. तिच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती मिळताच महिला व कुटुंब कल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मिळताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, ज्या कुटुंबांची घरे गेली आहेत त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. नुकसान झालेल्या घरांची पाहणी यापूर्वीच अधिकाऱ्यांसोबत करण्यात आले आहे. बडाल अंकलगी येथे घर पडून जखमी झालेल्या महिलेचा वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असून तिला वैयक्तिक आर्थिक मदत देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta