बेळगाव : अलतगाहून कंग्राळी (खुर्द)कडे कटिंग करायला दुचाकीवरून जात असताना दुचाकी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातानंतर नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढण्यात एसडीआरएफ टीमला यश आले आहे. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास “त्या” युवकाचा मृतदेह सापडला.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अलतगा युवक ओंकार पाटील हा वाहून गेला होता रविवारी सकाळी पासूनच एसडीआरएफ आणि हिरेमठ आणि सहकाऱ्यांच्या टीमने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नाल्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह शोधून काढला.
सकाळपासूनच घटनास्थळी पोलिस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी भेट देऊन शोधकार्याची माहिती घेतली होती. बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्विय सहाय्यक आणि केपीसीसी सदस्य मलगौडा हे देखील घटनास्थळी नजर ठेऊन होते. रात्रीही त्याचा शोध घेण्यात आला होता मात्र अंधारात शोधकार्यात अडचणी आल्याने सकाळी शोध कार्य पुढे चालू करण्यात आले होते.
ओंकार पाटील हा वायरिंग कामाला जात होता काल शनिवारी रात्री कटिंग करण्यासाठी म्हणून तो आपल्या चुलत भावासोबत (बचावलेला युवक ज्योतिनाथ) गाडीच्या मागे बसून कंग्राळी (खुर्द)कडे जात होता. अपघातात ओंकारच्या डोक्याला मार भरला त्यामुळे तो बेशुद्ध होऊन पाण्यात वाहून गेला असावा, अशी ही माहिती उपलब्ध झाली आहे. घटनेची नोंद काकती पोलिसात करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनीही मार्कंडेय नदी परिसराला भेट दिली आणि घटनेची माहिती जाणून घेतली.
Belgaum Varta Belgaum Varta