बेळगाव : नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्याला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेयनगर येथील यल्लप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या कुटुंबीयांची मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट घेतली.
यावेळी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मृत तरुणाच्या आई-वडीलांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. अशी घटना घडणे दुर्दैवी आहे, ही घटना घडायला नको होती. आमचे कुटुंब नेहमीच तरुणाच्या कुटुंबासोबत असेल, असा धीर त्यांनी दिला. कोणत्याही कारणास्तव धीर सोडू नका, मुलींना चांगले भविष्य द्या. त्यांचे उत्तमपद्धतीने संगोपन करा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांसह अनेकजण उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta