बेळगाव : कर्नाटक परिवहन मंडळाची बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन दहाहून अधिक प्रवासी जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सांबरा रोडवर घडली.
बेळगाव येथील सांबरा रोडवर परिवहन बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन बसमधील १० हून अधिक प्रवासी जखमी झाले. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मारिहाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta