
बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी आगीच्या दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
नावगे औद्योगिक परिसरातील एका खाजगी कारखान्याला नुकत्याच झालेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी आज कारखान्याला भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली व अपघात होऊ नयेत यासाठी कारखानदारांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे सांगितले. त्यानंतर कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या मार्कंडेय नगरातील यल्लाप्पा गुंड्यागोळ या तरुणाच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांचे व कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार जगदीश शेट्टर म्हणाले की, सर्व कारखान्यांनी खबरदारीचे उपाय पाळणे अत्यंत आवश्यक आहे. कामगारांच्या जीवितास हानी पोहोचू नये म्हणून कारखान्यांनी योग्य त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. नोकरदारांनी कामगारांच्या हिताची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार संजय पाटील, धनंजय जाधव, चेतन अंगडी, हेमंत पाटील, नागेंद्र देसाई, संतोष देसाई, ग्रामपंचायत सदस्य व कामगार उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta