बेळगाव : क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी गावात आंदोलन करणाऱ्या करवे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा स्थापन करण्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. उद्या क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची जयंती असून या पार्श्वभूमीवर बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे मुख्य सर्कलमध्ये पुतळा बसविण्याच्या मागणीसाठी करवे शिवरामगौडा गटाचे अध्यक्ष वाजीद हिरेकुडी, महंतेश रंगट्टीमठ आदींनी आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
या घटनेमुळे गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.