Tuesday , September 17 2024
Breaking News

कर्ले गावात भर रस्त्यात एकाचा निर्घृण खून

Spread the love

 

बेळगाव :  कर्ले गावात एकाचा भर रस्त्यात निर्घृण खून झाल्याची घटना सोमवार दि. 19 रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मृताचे नाव मोहन गिद्दु तलवार वय 55 असे आहे.

याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, कर्ले येथील माजी ग्रामपंचायत सदस्य असलेले मोहन तलवार हे सोमवारी दुपारी किणये येथून कर्लेच्या दिशेने दुचाकीवरून येत होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी मोहन यांच्यावर धारधार शस्त्रांनी मानेवर वार करून जखमी केले. त्यामुळे मोहन हे भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यावेळी काही जणांनी या घटनेची माहिती पोलिसांना व मोहन यांच्या घरी सांगितल्याने घराच्या सदस्यांनी त्या ठिकाणी येऊन गंभीर जखमी मोहन यांना दवाखान्यात दाखल केले. मात्र घाव वर्मी बसल्याने संध्याकाळी 5.30 च्या सुमारास मोहनचा मृत्यू झाला. पुढील तपास बेळगाव ग्रामीण पोलीस करत आहेत. ग्रामीण पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. घटनेनंतर या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. सोमवारी रात्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

चांगळेश्वरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित श्री …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *