बेळगाव (वार्ता) : बेळगाव इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने जिल्हा रुग्णालयातील आयएमए हॉल येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. राजश्री अनगोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आयएमएचे सचिव डॉ. संतोष शिंदे यांनी पूजा केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाल्या, देशाच्या सीमेवर अहोरात्र काम करणार्या सैनिकांचे आमचे कार्य अनमोल आहे सर्व देशवासियांना त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्यामुळे भारतातील नागरिक सुरक्षित आहेत. सैनिक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सीमेवर तैनात राहून देश सेवा करत आहेत. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि कल्याणासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. सध्या लसीकरणामुळे कोरोना बाधीतांची संख्या कमी आहे. या काळात काम करणारे डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स, आरोग्य अधिकारी यांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनची कार्यकारिणी डॉ. मिलिंद हलगेकर, डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. उज्वला हलगेकर, डॉ. टेभला, डॉ. जाधव, डॉ. कोतवाल, डॉ. खोबरे, डॉ. शैलेश व जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होता.
Belgaum Varta Belgaum Varta