Thursday , March 5 2026
Breaking News

प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते प्रा. आनंद आपटेकर यांचा वाढदिवस सांबरा येथील माऊली लॉन येथे अनोख्या रीतीने नुकताच साजरा झाला.

चव्हाट गल्लीतील देवदादा ज्योतीबा सासनकठी मंडळ, शिवजयंती मंडळ, बेळगावचा राजा गणेशोत्सव मंडळ, सावरकर ग्रुपसह विविध मंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अन् त्यांना दीर्घायुष्य लाभण्याची कामनाही केली. यावेळी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आपली साथ सदैव अशीच राहावी, अशी भावना व्यक्त केली. तुमचा हातुन गरिबांच्या कल्याणासाठी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा घडो ही जोतिबा चरणी प्रार्थना केली.

प्रारंभी शिवबसव नगर येथील ज्योतिबा मंदिरात जाऊन
आरती म्हणून मंदिराच्या परिसरात आपटेकर यांना चव्हाट गल्लीच्या वतीने पुष्पगुच्छ व श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर माऊली लॉन येथे केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थित लक्ष्मण किल्लेकर, सुनील जाधव, बाळू किल्लेकर, विनायक पवार, संदीप कामुळे, निशा कुंडे, अनंत बामणे,रोहन जाधव, श्रीनाथ पवार, सुधीर धामणेकर, अनंत हंगीरगेकर, जोतिबा पवार, सौरभ बामणे, निलेश गुंडकल, सत्यम नाईक, विशाल कुट्रे, अनिल गुंडकल, ओमकार मोहिते, सचिन बेळगावकर, राहुल जाधव, अभि नाईक, प्रभाकर जाधव, आकाश धुराजी, वृषभ मोहिते, विशाल गुंडकल, अप्पजी राडे, अनिल अंबरोळे, बाबू कोले, श्रीधर खन्नूरकर यासह अन्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *