बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवार दिनांक २५ रोजी दुपारी ठीक दोन वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीमध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन कार्यकारिणीबाबत व इतर विषयाबद्दल चर्चा करण्याबद्दल ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारी सदस्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, नवीन कार्यकारी सदस्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, युवा नेते आर. एम. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, माजी तालुका पंचायत अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, मोनापा पाटील, मराठी बँकेचे संचालक बी. एस. पाटील, अनिल पाटील, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील, मनोर हुंद्रे, यांनी केले आहे.