बंगळुरू : वाल्मिकी विकास महामंडळाचा निधी बेकायदेशीरपणे हस्तांतरित केल्याच्या कथित प्रकरणाच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्या नातेवाईकांच्या घरावर छापा टाकला आहे.
वाल्मिकी कॉर्पोरेशनमधील घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी बेळ्ळारी, रायचूर, कोप्पळ येथे छापे टाकले. तसेच नागेंद्रचे नातेवाईक एरीस्वामी आणि काही निकटवर्तीयांच्या घरांवर छापे टाकून तपासणी केली. या प्रकरणातील आरोपपत्र सादर करण्याची वेळ जवळ येत असल्याने ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आल्याची माहिती हाती अली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta