बेंगळुरू : राज्य सरकारने बेळगावच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या उपसंचालक पदासह विविध पदांवर नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले आहेत.
लीलावती शिवय्या हिरेमठ यांची बेळगाव जिल्हाशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या बेळगाव शहर गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. जिल्हाशिक्षणाधिकारी हे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त होते.
उपसंचालक बेंगळुरू आयुक्त कार्यालय म्हणून वायसी रविकुमार, रायचूर डाएटच्या प्राचार्या इंदिरा गंगण्णा, चिक्कमंगळूर डाएटच्या प्राचार्या केएम सुनीथा, म्हैसूर प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष टीएन गायत्री, बंगळुरू आयुक्तालयाचे उपसंचालक एमडी उषा, निवासी शिक्षण संस्था बंगळुरूचे उपसंचालक एन. लक्ष्मी पती, गणपत भट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta