Friday , March 6 2026
Breaking News

इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग

Spread the love

 

 

बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन)तर्फे दि. 20 ते 26 सप्टेंबर हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून सूरू करण्यात येत आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे रोज सायंकाळी 6.30 ते 8.30 पर्यंत होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण आहे? आत्मा काय आहे? पुनर्जन्म ही एक कल्पना आहे की वास्तविकता? याच बरोबर चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते? सर्वोत्तम योग कोणता? आणि व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचे उपयोग काय? या विषयावर मार्गदर्शन केले जात आहे.
या अभ्यासवर्गात प्रवचन, लाईव्ह शो, व्हिडिओ, प्रश्न उत्तर बरोबरच महाप्रसादाचे वितरण केले जानार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा त्यासाठी 7264001247 किंवा 9035530030 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन इस्कॉनच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *