बेळगाव : केजीबी स्पोर्ट्स कंग्राळ गल्ली आयोजित 45 वी श्री गणेश ट्रॉफीचे उद्घाटन प्रायोजक श्री. सुहास पाटील, शरद पाटील व प्रतीक पाटील एसपी कार ॲक्सेसरीजचे संचालक व कंग्राळी गल्लीचे पंच मंडळ श्री. मालोजीराव अष्टेकर, श्री. शंकर बडवानाचे, श्री. बाबुराव कुट्रे, आयोजक पंकज पाटील, विनायक निळकंठ्याचे, सुशांत शिंदे, अनिल पाटील, रोहित मुरकुटे तसेच स्पर्धक व क्षेत्ररक्षक सुनील पाटील, अथर्व शंभूचे, पवन बडवानाचे, सुजित शंभूचे, सचिन सहानी, संदीप पाटील, मनोज निर्मळकर, राजू बडवानाचे, गजानन बडवानाचे, अथर्व यादव, यश अडकूरकर, सुहास अडकूरकर, निंगाप्पा बेनके, आकाश ईटेकर, किरण तळेकर, रोहित पाटील, आर्यन कांबळे, प्रतीक बाळेकुंद्री, मनोज तहसीलदार, परशराम बडवानाचे, राजू केलीगिरी, परशराम तोरे, रजत शंभूचे, राजू सदरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 64 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सर्व स्पर्धकांसमोर चिठ्ठ्या उडवून मॅचेस ठरवण्यात आल्या व त्यानुसार सहा चेंडूचे शतक ठरवून मॅच खेळवण्यात आल्या. ही पद्धत गेल्या 45 वर्षापासून पावसाळ्यानंतर क्रिकेटला सुरुवात म्हणून एक मुहूर्त समजून क्रिकेटला सुरुवात करण्यात संपूर्ण बेळगावमध्ये सुरुवात करण्यात येते. केजीबी कंग्राळ गल्ली हा एकमेव संघ अनेक वर्षापासून ही स्पर्धा यशस्वीपणे राबवते. पावसाचा व्यत्यय येत असतानाही ही स्पर्धा घेण्यात आली.