बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्यातर्फे 18 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व कै द. रा. किल्लेकर सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचा निकाल जाहीर झाला आहे. या स्पर्धेचे परीक्षण श्री. एस. एन. गावडे, श्री. पी. आर. पाटील व श्री. एस. डी. कांबळे यांनी केले आहे.
या स्पर्धांचा निकाल पुढील प्रमाणे : मराठी व्याकरण स्पर्धा माध्यमिक विभाग : प्रथम क्रमांक प्रसाद मोळेराखी मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक सई शिंदे कुद्रेमणी हायस्कूल, तृतीय क्रमांक रिया मंगण्णावर मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल, उत्तेजनार्थ : श्रावणी पाटील संजय गांधी विद्यालय, पुजा अनगोळकर बालिका आदर्श विद्यालय, करूना रुतकुटे शिवाजी हायस्कूल, दिया जाधव शामराव देसाई हायस्कूल, पायल शहापूरकर भगतसिंग हायस्कूल.
प्राथमिक विभाग निकाल : प्रथम क्रमांक प्रेरणा पाटील मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक अतुल ओऊळकर मामासाहेब लाड विद्यालय, तृतीय क्रमांक अनुष्का धुरी संजय गांधी विद्यालय, उत्तेजनार्थ : सृष्टी देसाई बालिका आदर्श विद्यालय, कल्याणी पाटील सरस्वती गर्ल्स हायस्कूल, सरोजा शिंदे कुद्रेमणी हायस्कूल, शिवनंदिनी धनाजी लाल बहादूर शास्त्री विद्यालय, वैष्णवी गोवेकर संभाजी हायस्कूल.
कवी द. रा. किल्लेकर सुंदर हस्ताक्षर स्पर्धा निकाल : प्राथमिक विभाग, प्रथम क्रमांक हर्ष पाटील मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक प्रज्ञेश गाडेकर मराठी प्राथमिक शाळा सरोळी, तृतीय क्रमांक श्रध्दा सुतार संजय गांधी विद्यालय.
उत्तेजनार्थ : स्वराली देसुरकर सरकारी मराठी शाळा बेनकनहळी, प्रियल पाखरे सरकारी मराठी शाळा इदलहोंड, विघ्नेश शिंदे ठळकवाडी हायस्कूल.
हस्ताक्षर स्पर्धा माध्यमिक विभाग निकाल : प्रथम क्रमांक सानिका रमेश पाटील मराठी विद्यानिकेतन, द्वितीय क्रमांक राधिका फटाण वनश्री हायस्कूल हलगा, तृतीय क्रमांक प्रतिज्ञा हुंदरे मराठा मंडळ जिजामाता हायस्कूल.
उत्तेजनार्थ : साक्षी जांबोटकर कुद्रेमणी हायस्कूल, वेदांती पाटील संजय गांधी विद्यालय, ऋणाली पाटील महात्मा गांधी हायस्कूल गोंडवाड.
वरील यशस्वी विद्यार्थ्यांना साठे मराठी प्रबोधिनीच्या 24 व्या मराठी बाल साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी अभिनंदन केले आहे.