बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट आणि कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी टिळकवाडीतील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती शिरीष गोगटे, भाजप नेते डॉ. रवी पाटील, बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना अध्यक्ष अविनाश पोतदार, कृष्णामूर्ती एस, विजय तळवार, अजित सिद्धनावर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी शिरीष गोगटे यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, सचिन हंगेरगेकर, विशाल मुरकुंबी, श्रीराम कुलकर्णी, गिरीश पाटणकर, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 200 हून अधिक शरीरसौष्ठव पटूनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती.
Belgaum Varta Belgaum Varta