बेळगाव : शिवाजी हायस्कूल कडोली येथे घेण्यात आलेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सी. एस. सी. टी. एस. देसूर हायस्कूल देसुर मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात गोपाळकृष्ण पोटे, रोहन गुरव, रितेश मरगाळे, कपिल निटूरकर, सुशांत पाटील, करण गोरल, रामकृष्ण पाटील, विश्व लोहार, सुमित चौगुले, श्रेयश वसुलकर, सोमनाथ मादर, ओमकार पाटील यांचा समावेश आहे. संघाला मुख्याध्यापक एस. पी. धबाले, संस्थापक डी. एस. देशपांडे व गावकरी यांचे प्रोत्साहन लाभले क्रीडाशिक्षक आर. डी. गुरव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.