बेळगाव : भाषावार प्रांतरचनेपासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बेळगावसह सीमावासीय आजपर्यंत लढत आहेत. 67 वर्षे झाली आम्ही अजून ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, पण हल्ली महाराष्ट्र मात्र सीमाप्रश्नावर उदासीन दिसतोय, सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच न्यायालयात आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळणं काळाची गरज आहे. न्यायालयीन कामकाज पाहणाऱ्या वकिलांची फी सुद्धा पोहोचली नाही यावरून कळते की महाराष्ट्र या प्रश्नाविषयी किती गंभीर आहे. महाराज आपणास विनंती आहे की आपण महाराष्ट्र सरकारची कान उघडणी करावी आणि कोर्टाच्या कामकाजात लक्ष घालण्यास सांगावे. तसेच बेळगावसह सीमाभागात मराठी माणसावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवावा आपण हे कराल अशी आशा आहे.
असे निवेदन युवा नेते शुभम शेळके, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य मनोहर हुंदरे, चिटणीस प्रवीण रेडकर, दक्षिण विभाग प्रमुख नारायण मुचंडीकर, किरण मोदगेकर, चंद्रकांत पाटील यांच्या वतीने देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta