बेळगाव : बेळगाव दक्षिण उपनोंदणी कार्यालयात सुरू असलेला एजंटांचा दरबार आणि सर्वसामान्यांसाठी अवलंबल्या जाणाऱ्या विलंबाची धोरणाच्या निषेधार्थ आज बेळगाव येथील वकील संघटनेने दक्षिण उपनोंदणी कार्यालयाला घेराव घालून संताप व्यक्त केला.
दक्षिण उपनिबंधक कार्यालय, बेळगाव येथील कर्मचारी प्रलंबित काम करत आहेत. एजंटांचे काम करणारे कर्मचारी जनतेची कामे करण्यात दिरंगाईचे धोरण अवलंबत आहेत. एका दिवसात लागणाऱ्या कामासाठी विलंब लावून सर्वसामान्य जनतेला अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हि बाब यापूर्वीदेखील उपनिबंधकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून याबाबत गांभीर्याने लक्ष पुरविण्यात यावे. अधिकृत बॉण्ड रायटरचे अर्ज स्वीकारून बनावट कागदपत्रे मिळवून देण्याचे काम सुरु असल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच विलंबाचे धोरण न अवलंबता, शासकीय नियमांचे पालन करावे, तसे न केल्यास उत्तर व दक्षिण या दोन उपनिबंधक कार्यालयांना टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वकील संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.