
बेळगाव : शहापूर येथील पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेले रुद्राप्पा वीरभद्रप्पा अंगडी 38 वर्षाच्या पोस्ट विभागातील सेवे नंतर निवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
रुद्राप्पा अंगडी हे मूळचे तिगडी गावचे. त्यांनी आपल्या मूळ तिगडी गावी सत्तावीस वर्षे पोस्ट सेवा बजावली. त्यानंतर शहापूर बॅरिस्टर नाथ पै येथील पोस्टात गेले अकरा वर्षे ते कार्यरत होते. मल्टी टास्क सर्व्हिसेस ही त्यांच्याकडे जबाबदारी होती. त्याचबरोबर पोस्टल युनियनचे सेक्रेटरी म्हणूनही ते काम करत होते. आपल्या 38 वर्षाच्या पोस्ट सेवेनंतर ते निवृत्त झाले. त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण यांनी त्यांचा शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
यावेळी पोस्टमास्टर एस. आर. कांबळे, पत्रकार श्रीकांत काकतीकर, पोस्टमन बी. आर. उमदार, संतोष कट्टी, वेंकटेश मगलुर आदीही उपस्थित होते. उपस्थितांनी अंगडी यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. याचबरोबर मुख्य पोस्ट विभागाच्या वतीने ही रुद्राप्पा अंगडी यांचा सत्कार करण्यात आला. विभागीय सुप्रिडेंट विजय ओडोणी, चिकोडीचे विजय दाणी यांनी त्यांचा सत्कार करून भावी कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
Belgaum Varta Belgaum Varta