


बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित पाचव्या दिवसाच्या दौडीची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी कॉलनी येथून झाली. प्रारंभी श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करून आरती म्हणण्यात आली. त्यानंतर सीपीआय परशुराम पूजेरी तसेच माजी सैनिक शिवाजी कंग्राळकर यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दौडीला सुरुवात झाली. त्यानंतर महर्षी रोड, पहिला गेट, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस मार्गे ही दौड अनगोळ येथे पोहचली. संपुर्ण अनगोळ भाग फिरून लक्ष्मी गल्ली येथील श्री महालक्ष्मी मंदिर येथे डॉ. गोपाळराव साळुंखे यांच्या हस्ते आरती करून दुर्गामाता दौडिचा ध्वज उतरविण्यात आला. यावेळेस अनगोळ विभागात अनेक देखावे सादर करण्यात आले होते. त्यात हिंदू धार्मिक सणांचे देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या दौडीत महिलावर्ग व बालवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्याच्या वडगाव विभागात होणाऱ्या दौडीच्या शेवटी श्री मंगाई मंदिर येथे डॉक्टर दीपक करंजीकर यांचे व्याख्यान होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta