बेळगांव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीदरम्यान चर्चेवेळी कर्नाटक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून पक्ष बांधणी बळकट करण्यासाठी भेटीदरम्यान चर्चा झाली असून लवकरच कर्नाटक राज्यात पदाधिकाऱ्यांची नवीन कार्यकारिणी करण्यात येईल असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रकाश मोरे यांनी सांगितले.
ते म्हणाले शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक पक्ष जोमाने कामाला लागला असून भविष्यात अनेक उपक्रम हाती पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळापर्यंत पोहचवण्याच्या उद्दीष्टाने अनुभवी व युवक संघटनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. बेळगांव जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेवून जिल्हाध्यक्ष जोतिबा चव्हाण पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून विशेष कौतुक करण्यात आले तसेच येणाऱ्या काळामध्ये जि. पं., ता. पं. निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जोमाने लढवणार आहे असे सरचिटणीस प्रकाश मोरे यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta