बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज बेळगावमधील विविध वसतिगृहांना भेट देऊन पाहणी केली.
रामतीर्थ नगर येथील श्री डी देवराज अरसु मुलांचे वसतिगृह, अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह, डॉ. बी. आर. आंबेडकर सरकारी वसतिगृह, एस. टी मुलांचे वसतिगृह आदी वसतिगृहांना भेट देऊन तेथील एकंदर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वसतिगृह अधिकारी आणि कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून तेथील समस्या देखील जाणून घेतल्या.