बेळगाव : तालुका पंचायत अधिकारी राजेश धनवाडकर यांनी आज दि. 4 रोजी येळ्ळूर ग्राम पंचायतला भेट देऊन कचरा विस्थापन केंद्र व उद्योग खात्री योजनेमध्ये चाललेल्या कामाची पाहणी करून रोजगार महिला व पुरुषांना फर्स्ट एड किटचे वितरण करण्यात आले. तसेच येळ्ळूरमधील पुढील विकासकामासंदर्भात येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य पीडिओ, समवेत चर्चा करून पुढील विकासकामासाठी निधी मंजूर करून देण्याची खात्री दिली. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मी मासेकर, सदस्य रमेश मेणसे, प्रमोद पाटील, जोतिबा चौगुले, शिवाजी नांदूरकर, राकेश परीट, शशी धुळजी, अरविंद पाटील, कल्लाप्पा मेलगे उपस्थित होते.
