क्रीडा भारतीतर्फे सोमवारी सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोज
बेळगांव : फेब्रुवारी कॉलेज रोडवरील लिंगराज कॉलेज महाविद्यालयाच्या मैदानावर आयुष मंत्रालय भारत सरकारच्या मान्यतेने क्रीडाभारती, पतंजली योग समिती व केएलई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन सकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या “आजादी का अमृत महोत्सव” याचे औचित्य साधून यंदा प्रथमच लिंगराज कॉलेजच्या मैदानावर हजारो संख्येच्या उपस्थितीत सामुहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केएलई संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. प्रभाकर कोरे, आमदार अँड. अनिल बेनके, क्रीडा भारती राज्याध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, सचिव अशोक शिंत्रे, जिल्हा क्रीडा भारती संयोजक विश्वास पवार, योग पतंजली समितीचे जिल्हाध्यक्ष मोहन बागेवाडी, पतंजली योग राज्य समिती सदस्य व योग प्रशिक्षक किरण मन्नोळकर, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, शहर गटशिक्षणाधिकारी रवी बजंत्री, बेळगाव शहराचे शारीरिक शिक्षण अधिकारी एल. बी. नाईक, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी बेळगाव शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षकांनी व विविध क्लब अकादमी संस्थेच्या खेळाडूंनी व प्रशिक्षकांनी सकाळी 6.30 वाजता लिंगराज कॉलेजच्या मैदानावर उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा भारती जिल्हा संयोजक विश्वास पवार व पतंजली योग प्रशिक्षक किरण मन्नोळकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
Check Also
राहुल गांधी यांचे बेळगावात आगमन; जल्लोषात स्वागत
Spread the love बेळगाव : बेळगावात होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाच्या शतकमहोत्सवी कार्यक्रमासाठी लोकसभा विरोधी पक्षनेते …