Wednesday , March 4 2026
Breaking News

सांबरा विमानतळ उडवण्याची धमकी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील सांबरा विमानतळाला धमकीचा ई मेल आल्याने खळबळ माजली होती. पोलिसांना याची माहिती विमानतळ प्रशासनाने देताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस विमानतळावर दाखल झाले. पोलिसांनी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानतळाची तपासणी केली. या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. पोलिसांनी विमानतळाच्या बाहेरील परिसराची देखील तपासणी केली. पण काहीही आक्षेपार्ह आढळले नसल्याने विमानतळ प्रशासनाने आणि पोलीस खात्याने सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी मारीहाळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. ई मेल पाठवणाऱ्याचा आता पोलीस खाते शोध घेत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *