बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात जायंटस विकचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये किल्ला येथील आराधना दिव्यांग स्कूलच्या विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचा बक्षिस वितरण कार्यक्रम जायंट्स भवनच्या सभागृहात विजेत्याना पाहूण्यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. व्यासपिठावर जायंट्स अध्यक्ष अविनाश पाटील, फेडरेशन -6 चे उपाध्यक्ष श्रीधन मलीक, फेडरेशन कोऑर्डीनेटर ग्रुप एक्सटेंशन आरती शहा, माजी अध्यक्ष सुनील मुतगेकर, उपाध्यक्ष लक्षमण शिंदे, आराधना शाळेचे मुख्याध्यापक गजानन सूतार सर उपस्थित होते. जायंट्स मेन ही बेळगावात नावारुपास आलेली संस्था असून स्वताची वास्तू उभी केली असून सामाजीक कार्यात अग्रेसर आहे असे विचार आरती शहा यानी व्यक्त केले. श्रीधन मलीक यानीही जायंट्स मेनचे कौतूक केले. मागील फेब्रूवारी महिण्यापासून पावसाळा सूरू होईपर्यत दररोज पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा करून पाच गावची तहान भागवनारे सामाजिक कार्यात तत्पर असणारे जायंट्स सदस्य गोविंद टक्केकर यांचाही यावेळी स्मृतीचिन्ह व गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी जायंट्सचे माजी अध्यक्ष संजय पाटील, विकास कलघटगी, अनंत जांगळे, अशोक हलगेकर, उपाध्यक्ष लक्षमण शिंदे, राहूल बेलवलकर, अनंत हावळ, अरविंद देशपांडे, आनंद कुलकर्णी, राजू बांदिवडेकर, मुकुंद महागावकर, पांडूरंग पालेकर आणि आराधना शाळेचे शिक्षक उपस्थित होते. शेवटी अनिल चौगूले यानी आभार मानले.