Friday , March 6 2026
Breaking News

एसडीए कर्मचारी आत्महत्या प्रकरणी तीन जणांवर एफआयआर : पोलीस आयुक्त

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव येथील एसडीए कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात तीन जणांवर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी तपास अधिक गडद होत असताना, पोलिसांनी तपासासाठी उच्च अधिकाऱ्यांना नियुक्त केले आहे. याबाबत पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बेळगावमधील तहशिलदार कार्यालयात झालेल्या एसडीए कर्मचाऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर एफआयआर नोंदवले असून, तपासाची सूत्रे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहेत. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना सांगितले, की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. तपास सुरू असून काही लोकांची चौकशी सुरु आहे. तहशिलदार, एसी ऑफिसकडून माहिती मिळवली आहे.रुद्रेश यडवन्नवरने आत्महत्या करण्यापूर्वी वॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवले होते. यामध्ये मंत्र्यांच्या स्वीय सचिवांचे नाव समोर आले आहे. याबाबत तपासणी सुरू आहे. रुद्रेशचा मोबाईल त्याच्या कुटुंबियांकडे आहे, तो मोबाईल एफएसएलकडे पाठवून मोबाईलमधून माहिती मिळविण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले असून बँक स्टेटमेंट आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. रुद्रेशच्या फोन कॉल्स ची तपासणी करण्यात येत असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा केला जाईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. तपासाच्या प्रारंभिक टप्प्यात पोलिसांनी रुद्रेशच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून मेसेजचे स्क्रीनशॉट घेतले आहेत, जे तपासाच्या पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *