बेळगाव : अमेरिकेतील ओरलॅंडो शहरात नुकत्याच झालेल्या ऑफिशीयल वर्ल्ड डान्स चॅम्पिअनशिप स्पर्धेत बेळगावच्या प्रेरणा गोणबरे हिने प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक व अडीज लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळवले आहे. जगभरातील १७०२ नर्तक या संगणकाधारित नृत्य स्पर्धेच्या निवड स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात निवडक स्पर्धकांची पुढील स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये परत फेरनिवड होऊन बेळगावातील एम स्टाईल डान्स अँड फिटनेस अकॅडमीची विद्यार्थिनी प्रेरणा गोणबरे व प्रशिक्षक महेश जाधव यांना निमंत्रण देण्यात आले. अंतिम फेरीत १०२ स्पर्धकांतून ८९ गुणांसह प्रेरणा गोणबरे सुवर्णपदक पटकावणारी पहिली स्पर्धक ठरली. यापूर्वी २०१८ मध्ये बार्सिलोना (स्पेन) येथे झालेल्या वर्ल्ड डान्स स्पर्धेत ४५ देशांतील स्पर्धकांतून प्रेरणाने आठवा क्रमांक पटकावला होता. २०१९मध्ये बँकॉक येथील इंडियाज इंटरनॅशनल ग्रोफेस्टमध्ये पार्थ गोणबरे आणि प्रेरणा या भावंडांनी सुवर्णपदक पटकावले होते. त्याचवर्षी दुबईत झालेल्या ग्रोफेस्टमध्ये या भावंडांनी कांस्य पदक पटकावले होते. प्रेरणा ही केएलएस गोगटे कॉमर्स कॉलेजमध्ये बारावीत शिकत आहे. तिला नृत्य प्रशिक्षक महेश जाधव यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …