Tuesday , March 3 2026
Breaking News

ग्रामीण भागातील रस्ते तात्काळ दुरुस्त करावेत

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण भागाच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून वारंवार मागणी करून देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. प्रामुख्याने बेळगाव -बाची, बडस-बाकनूर, मच्छे-वाघावडे, मुतगा-सांबरा या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी महापौर शिवाजी सुंठकर, मार्कंडेय साखर कारखान्याचे चेअरमन आर. आय. पाटील, सुनील अष्टेकर, पुंडलिक पावशे, लक्ष्मण लाळगे, बेळगाव राष्ट्रवादीचे महंतेश कोळूचे, किसन सुंठकर आदींनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सुब्बाराव आणि सहाय्यक अभियंता कोलेकर यांची भेट घेऊन चर्चा केली आणि ग्रामीण भागातील सर्व रस्ते तात्काळ दुरुस्ती करण्याची विनंती केली.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *