बेळगाव : बेळगाव तालुक्यातील सुळगा (येळ्ळूर) गावात १५ हून अधिक जणांच्या टोळक्याने चौघांवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगाव तालुक्यातील सुळगा (येळ्ळूर) गावातील २० गुंठे जमीन वादातून गोंधळ उडाला. गावातील अरविंद पाटील यांच्याबाजूने डीसी, एसी आणि कोर्टाने आदेश दिले आहेत. दुसऱ्या गटाने स्थगितीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयात प्रतिबंधात्मक आदेश न मिळाल्याने त्यांनी अरविंद पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता काही तरुणांशी वाद झाला. यावेळी अचानक १५ जणांच्या टोळक्याने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गावकरीही सामील झाले. या प्रकरणी आरोपींनी दुचाकी घटनास्थळीच सोडून पळ काढला. या घटनेत दोन हल्लेखोरही जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta