बेळगाव : चलवेनहट्टी येथे गावच्या प्रवेशद्वारावरील स्वागत कमानीचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले. आजी – माजी सैनिक संघटनेच्या स्वखर्चाने स्वागत कमान उभे करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील हे व्यासपीठ उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत अध्यक्ष अमृत मुद्दनेवर तसेच करीहाळ व बेक्कीनकरे येथील आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनुक्रमे नारायण बसर्गे व चंद्रकांत गावडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्याच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन ब्रम्हलिंग देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मल्लाप्पा बडवाणाचे यांच्या हस्ते करण्यात आले तर सैनिकांच्या नामफलकाचे पुजन नारायण बसर्गे तसेच चंद्रकांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य कार्य म्हणजे स्वागत कमानीचे उद्घाटन चलवेनहट्टी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यापुर्वी प्रथम प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यीनीनी ईशस्तवन तसेच स्वागताने उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केलेष. तर प्रमुख पाहुण्याचे शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सामाजिक सेवेतील व गावातील व्यक्तीचे विविध मंडळाचे अध्यक्ष यांच्यासह उपस्थितांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक जोतिबा पाटील यांनी प्रास्तविक करताना कार्यक्रमाचा तसेच स्वागत कमान उभे करण्याचा मुख उद्देश सांगितला यावेळी अमृत मुद्दनेवर यांनी आपले मनोगत मांडताना सैनिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. यावेळी चंदकांत गावडे यांनी आशा सैनिक संघटना प्रत्येक गावात निर्माण झाल्या पाहिजेत असे सांगितले नारायण बसर्गे यांनी पण आपले मनोगत मांडताना सैनिक संघटनेच्या माध्यमातून अशी विधायक कार्य होत गेल्यास सैनिकांनाच्या माध्यमातून गावचे लहान मोठे प्रश्न मार्गी लागतील असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील चाळोबा आलगोंडी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एम. सी. वार्णुळकर यांनी मनोगत मांडले. अध्यक्षीय भाषणात मनोगत व्यक्त करताना कृष्णा पाटील यांनी ही स्वागत कमान आपल्या सैनिक संघटनेच्या माध्यमातून जरी बांधली असली तरी ही स्वागत कमान संपूर्ण गावची असून गावातील प्रत्येक नागरिकांनी त्यांची काळजी घेतली पाहिजे. सैनिक संघटना आसो अथवा नसो पण कमान राहीली पाहिजे असे मत व्यक्त करताना ही कमान गावाला अर्पण करत आहोत असे सांगितले. यावेळी कमान बांधकामांचे कलेहोळ येथील इंजिनिअर विनायक पाटील तसेच सेंट्रीग मेसरी भुषण पाटील, गवंडी मेसरी जोतिबा कितवाडकर, यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला, तसेच सैनिक संघटनेतील निंगाप्पा हुंदरे, जोतिबा पाटील, नारायण हुंदरे, जोतिबा बडवाणाचे यांचा शाल श्रीफळ आणि पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर हुंदरे यांनी केले तर अभार प्रदर्शन संतराम आलगोंडी यांनी केले. यावेळी मल्लाप्पा हुंदरे, परशराम पाटील, मारुती पाटील, मनोहर राजाई, दिपक हुंदरे, परशराम बडवाणाचे, मोहन हुंदरे, परशराम आलगोंडी, निंगानी हुंदरे, प्रकाश बडवानाचे, लक्ष्मण बडवाणाचे, कल्लाप्पा पाटील, तानाजी पाटील, मारुती हुंदरे, कुमाण्णा हुंदरे, नंदा हुंदरे, रेणुका सनदी, अप्पयगौडा पाटील, शट्टूप्पा पाटील, मल्लाप्पा शट्टू हुंदरे, गुरुनाथ पाटील, इराप्पा कलखांबकर, भक्तेश पाटील, नागराज पाटील, अमर नाथबुवा, अनिल पाटील, बाळु पाटील आदी उपस्थित होते.