Friday , March 6 2026
Breaking News

अंजनेय नगर येथील सभागृहाचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते

Spread the love

बेळगाव : येथील अंजनेय नगरमध्ये श्री गणेश मंदिरानजीक स्थानिक नागरिकांच्या विनंतीला मान देऊन आमदार अनिल बेनके यांनी याठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या सभागृहाचा भूमिपूजन कार्यक्रम आज उत्तरचे आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते पार पडला.

येथील नागरिकांना समारंभ कार्यक्रम किंवा कोणताही उत्सव करण्यास सभागृहाची आवश्यकता होती. त्यामुळे येथील नागरिकांनी पाठपुरावा करून आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागणी केली होती. त्यामुळे त्यांच्या या विनंतीला मान देऊन ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावण्याकरिता आमदारांनी या ठिकाणी सभागृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचा भूमिपूजन कार्यक्रम आज पार पडला. यावेळी अंजनेय नगरमधील नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

Spread the love  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *