बेळगाव : बेळगाव येथे रेल्वे रुळावर झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या मागील भागात असलेल्या रेल्वे रुळावर मंगळवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. दादरहून हुबळीकडे जाणाऱ्या लोकमान्य एक्सप्रेस रेल्वेखाली झोकून देऊन अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केली. त्यानंतर मागून येणाऱ्या मिरज रेल्वेच्या चालकाने मृतदेह पाहून रेल्वे थांबवली आणि पोलिसांना सूचित केले.
घटनास्थळी पोहोचलेल्या बेळगाव रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.